Friday 13 October 2023

कितना हुवा भैय्या?

 "भैय्या जरा एक किलो प्याज देना!"

"ये एक किलो प्याज हॊ गये.. और क्या दू?"

"और आधा किलो टमाटर और आलू भी देना."

"ये आधा किलो टमाटर और आलू भी हो गये. और कुछ?"

"आधा लिटर दूध."

"ये लो आधा लिटर दूध! और क्या दु?"

"बस हो गया.. कितना हुवा भैय्या?"

"आपका हुवा ९२"

"ये लो ९२ पेटीएम कर दिये है"

"ठीक है!"

हे आपलं दुकानदारासोबतचे दैनंदिन संभाषण. जेव्हापासून आपल्याला समजलंय कि शहरातले सुपर मार्केट वाले बहुदा राजस्थानी असतात तेव्हापासून आपण त्यांच्याशी आपण सुरुवात हिंदी मधून करतो.

आता मराठी भाषेचा कमी झालेला वापर हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाही. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही. मी सुद्धा प्रत्येक दुकानदार, रिक्षावाले , कॅबवाले यांच्याशी हिंदी मध्येच संवाद सुरु करायचो. थोडा संवाद झाल्यावर "अच्छा!! तुम्ही मराठी आहे का?" असं म्हणत पुढचं संभाषण मराठीत सुरु.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे.. असंच सुरु राहिलं तर मराठी बोलणार कधी? फक्त घरात च का? आता तर मराठी बोलता येणारे रिक्षा/कॅब वाले, दुकानदार वगैरे सुद्धा सुरुवात हिंदीतून करतात.

मी एक छोटा प्रयोग करून बघितला. ठरवलं कि मी सुरुवात मराठीतून करेन जर समोरच्याला समजले नाही तर च हिंदी/इंग्रजी मधे बोलू. आश्चर्य म्हणजे सुपर मार्केट वाल्यांना व्यवस्थित मराठी येत नसली तरी मला काय हवंय ते बरोब्बर कळले. आणि शक्यतो डिलिव्हरी बॉय, रिक्षा, कॅब वाले हे मराठी च असतात. क्वचितच एखाद्याला मराठी कळत नसते. मॉल मधेही कितीही महागड्या दुकानात जरी गेलात तरी तिथले बहुदा कर्मचारी मराठी च असतात. 

मराठी भाषिकांनी घरामधून बाहेर सुद्धा मराठी वापरली तर च भाषेचा चा जास्तीत जास्त वापर होईल. आपण हिंदी विरोधी आहे असं नाही पण एवढा मोठा सांस्कृतिक वारसा असलेली आपली मराठी भाषा आपणच का वापरू नये? जेव्हा वेळ पडेल तेव्हा हिंदी/इंग्रजी बोलूच कि! पण सुरुवात मराठीतून करू.

सोसायटी मध्ये हि बरेच मराठी कुटुंब बोलताना हिंदी बोलतात आणि नंतर "अर्रे तुम्ही पण मराठी च का! हि हि हि हि... कुठलं गाव? 🤝"

दुकानदाराला जर सलग दोन दिवस जरी आपण मराठीतून बोललो तरी तिसऱ्या दिवशी त्याला आपोआप सर्व समजेल. वरील संभाषण जर मराठीत झाले असते तर त्यात न कळण्यासारखे काहीच नाहीये. प्याज ला कांदा, आलू ला बटाटा, टमाटर ला टोमॅटो हे शब्द एका दिवसात समजतील त्यांना. आणि "कितना हुवा भैया" ला "किती झाले" हे तर सर्वांना न सांगता कळेलच.

आशा करतो कि सर्वांना मराठी भाषेचा आदर आहे. पण हिंदी च्या प्रभावाखाली आपण नकळत मराठी वापरत नाही. पण मराठी भाषेचा आदर ठेऊ आणि सुरुवात मराठीतून करू! जय महाराष्ट्र!

कितना हुवा भैय्या?

 "भैय्या जरा एक किलो प्याज देना!" "ये एक किलो प्याज हॊ गये.. और क्या दू?" "और आधा किलो टमाटर और आलू भी देना." ...